...
29/10/2022Blog Date

विहंगम ब्रह्मांडिय संकेत। - Blog 6

नमस्ते 🙏 मी सौ स्मिता तुषार वरंडे ज्योतिष मार्गदर्शक माझा मोबाईल नंबर 8975964175 आज नवरात्रीचा चौथा दिवस आजचे देवी रूप कुशमंडा देवी म्हणजे साक्षात अन्नपूर्णा च रूप आणि काल होती ती चंद्रघंटा देवी माता या वर आज मी ज्योतिषीय विश्लेषण करणार आहे याआजचा वार आहे गुरुवार आजची तारीख 29 आज आपण ज्योतिषीय दृष्ट्याt आपल्या ध्यानाचे सेशन आणि सर्व पत्रिका विश्लेषण करू आज चंद्र तूळ राशीत विशाखा नक्षत्रामध्ये केतू सोबत आहे आणि हे दोन्ही ग्रह विशाखा या गुरूच्या नक्षत्रात आहे किती छान योग बघा आजचा वार गुरुवार रंग पिवळा इथे गुरुतत्त्व कार्य होते आजची तारीख 29 बेरीज केली असता दोन येते दोन हा अंक चंद्राच्या अधिपत्याखाली येतो इथे परत चंद्र ऍक्टिव्ह झाला कन्या लग्नाची पत्रिका आहे पत्रिकेमध्ये कन्येचा बुध लग्न रवी सोबत इथे बुध आदित्य नामक राजयोग होतो म्हणजे आजचे जे भाषण ज्या ज्या लोकांनी केले ते खूप पावरफुल होते आता वाणी स्थानामध्ये चंद्र आणि केतू युतीमध्ये विशाखा नक्षत्रात आहे चंद्र म्हणजे मन आणि तो चंद्र वाणी स्थानात म्हणजे बडवे मॅडमनी अन्नपूर्णादेवी विषयी विश्लेषण केले आणि स्वयंपाक करताना अन्नपूर्णा स्तोत्र म्हणून स्वयंपाक बनवणे किती त्याचे फायदे होतात हे सांगितले ते खूपच महत्त्वाचे आहे कारण वातावरणातील स्पंदने नक्कीच आपल्या मनावर आणि अन्नावर प्रभाव टाकतात आणि अशा वातावरणात शिजवलेले अन्न आणि त्याचे व्हायब्रेशन असे सात्विक अन्न म्हणजेच उत्तम आरोग्याची गुरुकिल्लीच म्हणावी लागेल आता गुरुचरित्र विषयी जे काही प्राजक्ता मॅडम बोलल्या ते पण खूप समर्पक आणि खूपच छान अनुभूती देणारे होते. खरंच मी पण आत्ता पक्ष पंधरवड्यापासून गुरुचरित्र पोथी पारायण सुरू केले आहे माझी ही तिसरी वेळ आहे प्रचंड सुंदर अनुभूती येतात त्यामुळे सर्वांनी नक्की एकदा गुरुचरित्र वाचन करावे आयुष्यात येऊन गुरू करावा गुरुशिवाय मोक्ष नाही हे अगदी खरच आहे मी एक ज्योतिष मार्गदर्शक आहे आणि जेव्हा पत्रिका मांडते मी आणि जातक प्रश्न विचारतात तर खरं सांगू का त्यावेळी माझे गुरुच मला भविष्य कथन करत असतात मी निमित्त मात्र आहे गुरुच माझ्या तोंडून बोलत असतात देवांना पण काही अज्ञान नाही एवढी गुरूंजवळ शक्ती आहे साक्षात संजीवनी विद्या गुरूंजवळ आहे आज गुरुवार रंग पिवळा आणि मंगल मॅडम प्राजक्ता मॅडम बडवे मॅडम यांच्या वाणीतून जे काही साकार झाले ते खूपच अद्भुत आहे याचे सर्वांनी नक्कीच चिंतन करावे मंगल मॅडम आजचे आपले ध्यान खरंच अप्रतिम होते किती सुंदर बघा चंद्र म्हणजे आपले मन आणि मॅडम आज आपण मनावर जे काही बोललात ते सर्वांनी अनुभव करावे साक्षात चंद्रघंटा देवी माता आपल्यात प्रगट झाली आहे अशीच अनुभूती आली खूप आत्मविश्वास आणि ऊर्जा निर्माण झाली मॅडम आपला प्रत्येक शब्दातून निघणारी स्पंदने इतकी प्रचंड होती की खूप ऊर्जा अंगात संचारली. स्त्री शक्ती जागृत झाली आणि आज खऱ्या अर्थाने समजले की स्त्री ही मनाने हळवी नाही तर खूप स्ट्रॉंग आहे खूप खूप धन्यवाद मॅडम आज मी भरून पावले आज बघा चंद्राच्या अंमलाखाली पांढरा रंग येतो आणि माझे हे लिखाण चालू असताना माझ्या अंगावर पांढरेच वस्त्र आहे कसा योग आहे हा योग येतो म्हणजेच कुठेतरी आपण या ब्रम्हांडीय ऊर्जाशी एकरूप झालेलो असतो आणि बघा खिडकीतून बाहेर खूप मोठा पाऊस पडत आहे परत इथे चंद्र एकटीव झाला कारण चंद्र म्हणजे पाणी चंद्र हा शीतल आहे मन प्रसन्न करणारी रम्य सकाळ बाहेर पडणारा पाऊस आणि माझी लेखणी कागदावर शब्द उमटवत आहे खूप खूप सुंदर अनुभूती खूप लिहू इच्छिते परंतु आज मला खूप धन्यवाद देऊ वाटत सर्वांचे मी माझ्या गुरूंच्या चरणी कोटी कोटी प्रणाम या ब्रम्हांडीय ऊर्जेला खूप खूप धन्यवाद मंगल मॅडम ना खूप खूप धन्यवाद आणि बुद्धांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद धन्यवाद धन्यवाद🌹🙏🌹🙏🌹🙏


Add a new comment

Comments