
विहंगम ब्रह्मांडिय संकेत। - Blog 5
सौ स्मिता तुषार वरंडे सातारा। 8975964175 स्वामीं वाचून जसे घर शास्त्राध्ययना वाचून जसे मुख अथवा शिरान वाचून जसे शरीर त्याचप्रमाणे स्वरज्ञानाशिवाय ज्योतिषी शोभत नाही शिव म्हणजे प्राणशक्ती स्थायी आणि कायमस्वरूपी ऊर्जेचा स्त्रोत एकमेव चिरंतन अस्तित्व म्हणजे शिव शिव आकाश तत्व आहे चेतना आहे ज्यातून सर्व निर्मिले जो सर्वांचे पालनपोषण करतो आणि जात सर्व विलीन होईल तो शिव आहे ध्यान करताना आपल्याला ओंकार ऐकू येतात साक्षात शिव समोर दिसतात शिवसरोदय शास्त्र शिकायला दृढनिश्चय पाहिजे अध्यात्मिक पातळी खूप पाहिजे षडरिपूंचे दमन झाले पाहिजे तरच या शास्त्राची अनुभूती नक्की येते 🌹🕉️🌹 शिवस्वरोदय शास्त्रामध्ये प्रामुख्याने तीन नाड्या आहेत त्या याप्रमाणे इडा म्हणजे चंद्रनाडी म्हणजेच डावी नाडी पिंगला म्हणजे सूर्य नाडी म्हणजे उजवी नाडी आणि सुष्मना म्हणजे मधली नाडी 🌹🕉️🌹 स्वर म्हणजे काय स्वयम राजते किती स्वरा म्हणजे जो स्वतः चालतो तो स्वर व्याकरण शिकताना आपण स्वराची व्याख्या बघितली आहे कोणत्याही अवयवाला स्पर्श न करता तोंडावाटे बाहेर निघणाऱ्या ध्वनीला स्वर असे म्हणतात पण इथे स्वर म्हणजे सर्व ध्वनी निर्मितीचे कारण असलेल्या नाकावाटे आत जाणाऱ्या व बाहेर येणाऱ्या श्वासाला स्वर असे म्हटले जाते म्हटले आहे 🌹🕉️🌹 जर आपण दिवसाचे काम करताना आपल्या श्वासाकडे पूर्ण लक्ष दिले तर आपण योग्य कर्माकडे प्रयाण करतो आणि स्वतःला भगवंताच्या मार्गाकडे वळवतो 🌹🕉️🌹 इडा नाडी चंद्राच्या ऊर्जाशी संबंधित इडा आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या स्त्रीलिंगी पैलूचे प्रतिनिधित्व करते आणि बहुतेक वेळा पांढरा रंग दाखवत असते इडा परसिम्पेथेटिक मज्जा संस्थेचे कार्यनियंत्रित करते जे मन आणि शरीराला शांत करते कारण ते भावना आणि आठवणींची संबंधित आहे जेव्हा इडानाडी खूप मजबूत बनते तेव्हा थकवा नैराश्य अंतर्मुखता आणि स्पष्ट दृष्टिकोनातून गोष्टी पाहण्यात असमर्थता येऊ शकते 🌹🕉️🌹 पिंगला नाडी ही सूर्याच्या ऊर्जा शी संबंधित आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या मर्दानी पैलूचे प्रतिनिधित्व करते लाल रंगात ती दाखवते हे सहानभूतीशील मज्जा संस्थेवर नियंत्रण ठेवते आणि मनाच्या क्रियाकलाप आणि नियोजन उत्तेजित करते ही नाडी तर्कशुद्ध तार्किक आणि विश्लेषणात्मक बुद्धीसाठी जबाबदार आहे 🌹🕉️🌹 सुष्मना नाडी ही मानवी शरीरातील मध्यवर्ती वाहिनी आहे जी मणक्याच्या पायथ्यापासून डोक्याच्या मुकुटापर्यंत चालते कुंडलिनी ऊर्जा देते ध्यानाचा सराव सुषमा नाडी चालू असताना छान होतो ही नाडी तेव्हाच उघडते आणि मुक्तपणे राहते जेव्हा इडा आणि पिंगला नाड्या संतुलित आणि स्पष्ट असतात अशा प्रकारे तिन्ही नाडींचे शुद्धीकरण संपूर्ण आरोग्य शरीर आणि मनाच्या निरोगीपणासाठी महत्त्वाचे आहे एखाद्या व्यक्तीला आध्यात्मिक वाढ होण्यासाठी याचे अनुभव येतात 🌹🕉️🌹 डाव्या नाकपुडीवर जेवण करू नये कोणाच्या घरी जाऊन खाऊ नये जेव्हा चंद्र नाडी सुरू असते स्वयंपाक करताना सूर्यनाडी वर करावा पैसे घेताना डाव्या नाडीवर घेणे आणि डाव्या हाताने घेणे सोमवार बुधवार गुरुवार शुक्रवार चंद्र नाडी पाहिजे म्हणजे शुक्ल पक्षामध्ये रविवार मंगळवार शनिवार सूर्य नाडी पाहिजे 🌹🕉️🌹 मला आलेले अनुभव आणि काही नियम का पाळावे याची उदाहरणे 🌹🕉️🌹 आज मला माझे अनुभव व्यक्त करण्यासाठी मॅडमनी परवानगी दिली आणि आता एक ज्योतिष असल्यामुळे तिथी वार नक्षत्र याचा अभ्यास आणि त्याचा कसा सुंदर मिलाप होतो ते सांगते आज आहे शुक्रवार तिची अष्टमी आहे श्रावण महिना शुक्लपक्ष आणि ज्यावेळी मॅडमनी सांगितलं मला काल की तुम्हाला बोलायचं आहे तर त्यावेळी विष्टी करण योग चालू होता तर मी हो म्हणले त्यांना पण मनात चलविचल होती पण आज दुपारी साडेचार वाजता तो विष्टी करण योग संपला नक्षत्राचं म्हणाल तर आज स्वाती नक्षत्र होतं राहूच ते देखील संध्याकाळी साडेसहा वाजता संपून विशाखा नक्षत्र सुरू झाले. जे गुरुचे आहे गुरु हा ज्ञानार्जनाचं काम करतो किती सुंदर योग आणि आजची तारीख बघाल तर पाच तारीख आहे पाच हा अंक शास्त्रानुसार बुधाच्या अमलाखाली येतो बुध म्हणजे वक्ता भाषण कौशल्य आज बोलण्याची संधी मिळाली आजचा योग म्हणजे चंद्र आणि केतू एकत्र आणि हे शिवसरोदय शास्त्र गुड आहे आणि केतू देखील कारकच आहे असं खूप सुंदर अनुभव आणि माझं अनुभव कथन अपत्वावर पृथ्वी तत्वावर सुरू झालं हाये खूप छान योग मला आलाच 🌹🕉️🌹 आजचा दिवस म्हणजे इतका सुंदर माझी आईच घरी सवाष्ण म्हणून जेवायला आली आणि अन्नदानाचे काम माझ्याकडून आज भगवंतांनी करून घेतलं खूप सुंदर योग मला असा आधी वाटलं मी करू शकेल का स्वयंपाक पण झालं व्यवस्थित सगळं जेव्हा आपण अंतःकरणापासून निश्चय करतो तेव्हा ते कार्य यशस्वीच होतं मनापासून केलेल्या इच्छा पूर्ण होतात अथवा नाही परंतु आत्म्यापासून केलेल्या इच्छा पूर्ण होतातच कारण मन हे चंचल आहे म्हणूनच मॅडम तुम्ही जे म्हणलात की खूप लोकांनी ग्रुप जॉईन केले आणि लेफ्ट पण झाले कारण त्यांचं मन अस्थिर आणि चंचल आहे खूप ध्यानाच्या सरावांनीच आपण आपले मन स्थिर करू शकतो आणि मगच आपल्याला प्रचिती येतात हा अभ्यास सरावांनी होतो योगी पुरुषाने निश्चलचित्त करून चंद्र आणि सूर्यनाडीच्या मार्गावरून सर्व जाणावे आपला जीव स्थिर झाला असता तत्त्वचिंतन करावे जेव्हा चित्त अस्वस्थ असते तेव्हा तत्वचिंतन करू नये 🌹🕉️🌹 जेवण आणि पाण्याला आपण सकारात्मक ऊर्जा देऊन ते ग्रहण केले असता त्याचे खूप फायदे होतात आणि त्यासोबत जर का आपण इष्ट दिशांना म्हणजे पूर्व किंवा उत्तर याच दिशांना तोंड करून मौनव्रताने जेवण ग्रहण केले असता ते खूप लाभदायक होते पूर्वी वदनी कवल घेता हा जो श्लोक म्हणत होते तो किती सार्थ आहे पाण्याच्या बाबतीतही ते पाणी भगवंताचे तीर्थप्रसाद म्हणून ग्रहण केले असता तसे खूप फायदे होतात 🌹🕉️🌹 नेहमीच्या ध्यानाच्या सरावाने आपल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळत जातात ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला मदत करत असते आणि त्या त्या प्रकारे कोणाच्याही माध्यमातून आपल्याला संकेत दिले जातात पण ते संकेत ओळखण्यासाठी सुद्धा आपली अध्यात्मिक बैठक चांगली हवी आणि हे फक्त ध्यानातूनच होते 🌹🕉️🌹 हे शास्त्र खूप खूप आघात आहे जेवढे ज्ञान घेऊन अभ्यास करून सराव करून तेवढे आपल्याला मिळणार आहे आणि आता सुवर्ण युगात तर हीच शक्ती आपल्याला खूप फायदा देणारी आहे जिथे विज्ञान थांबते तिथे अध्यात्म सुरू होते 🌹🕉️🌹 मी खूप खूप धन्यवाद देते मंगल मॅडम ना 😊🙏 या शास्त्राचा अभ्यास होता परंतु आपल्या माध्यमातून आपल्या वाणीतून खूप सुंदर रीतीने मला हा अभ्यास समजला मी माझ्या गुरूंना वैश्विक शक्ती ना बुद्धांना कोटी कोटी नमन करते खरंच मी खूप भाग्यवान आहे या चातुर्मासाच्या काळामध्ये खूप वर्तवैकल्य केली जातात तर हीच सेवा ही ऊर्जा याचा जो आपल्याला लाभ मिळालेला आहे त्यासाठी माझ्याकडून कोटी कोटी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद🙏🕉️🙏 🌹🕉️🌹🕉️🌹🕉️