
विहंगम ब्रह्मांडिय संकेत। - Blog 2
शिवस्वरोदय शास्त्र क्लास एक ते पाच ऑगस्ट असा संपन्न झाला तर आपण आज एक तारखेचे योग काय होते ते जाणून घेऊया ज्योतिषीय भाषेमध्ये या क्लासची वेळ संध्याकाळी सात वाजता होती तीच कुंडली मांडून विश्लेषण बघू आजची तारीख 1 ऑगस्ट 2022 वेळ संध्याकाळी सात वाजता श्रावणी सोमवार विष्करणयोग शिवस्वरोदय शास्त्र ही विद्या महादेवांनी पार्वती मातेला दिली असा हा आजचा योग आहे हे शास्त्र अत्यंत गूढ शास्त्र आहे बघा आज विष्टी करण योग आहे आणि या योगावर मनात संभ्रम असतो की नक्की हे ज्ञान दुसऱ्याला देऊ की नको खूप वेळा मॅडम आपणाला हा प्रश्न पडला असणार कारण हे शास्त्रच असे आहे परंतु प्रबळ इच्छाशक्ती मनाशी केलेले संकल्प यामुळे सिद्धी प्राप्त होते हे नक्कीच बघा हा आजचा वार सोमवार म्हणजे इथं चंद्र ऍक्टिव्ह झाला चंद्र म्हणजे मन आणि दृढ संकल्प होण्यासाठी मनापेक्षा आपले हृदय काम करते म्हणून कुंडलिक सुद्धा रवी पण आहे म्हणून संकल्प सिद्धी झाली कारण आजची रास सिंह आणि नक्षत्र उत्तरा फाल्गुनी रवीचीच रास आणि रवीचे नक्षत्र किती सुंदर योग मन नुसता संकल्प करते परंतु आत्मा म्हणजे आपले हृदय तो संकल्प सिद्धीस नेतो तेच काम आत्माकारक रवीने केले आजच्या कुंडलीत शनी लग्नेश लग्नात मकर राशीत बघा म्हणजे शनि हा गुड विद्येचा कारक आहे आणि तोही लग्नी आहे आणि अष्टमस्थानामध्ये चंद्र आणि बुध हे दोन ग्रह आहेत म्हणजे अष्टमस्थान हे गूढ विद्येचेच असते आणि त्यात चंद्र आणि बुधासारखे ग्रह आहेत म्हणजे इथे आपण जी विद्या घेणार आहोत त्यासाठी मन आणि बुद्धीचा कार्यक्रम एकत्रित गुडस्थानामध्ये त्यामुळेच या कोर्समध्ये अगदी मोजके लोक जोडले गेलो पण खरोखरी बुद्धीवादी दृढनिश्चयी संकल्प पूर्ण करणारे आणि सगळ्यात महत्त्वाचे ज्याचे नशीब चांगले त्यांनाच हे ज्ञान घेता आले असा हा एक ते पाच या दिवसांमध्ये अत्यंत गूढ ज्ञानाविषयीचा कोर्स पूर्ण झाला आज मला हे ज्योतिषीय भाषेतील विश्लेषण करण्याचा योग आला खूप खूप धन्यवाद मंगल मॅडम ना वैश्विक शक्ती ना बुद्धांना माझ्या गुरूंना कोटी कोटी आत्मवंदन धन्यवाद.